पाच महिन्यात १५५ चोर्‍या; मोबाइल चोरीचे प्रमाण सर्वाधिक !

Foto


औरंगाबाद : रेल्वे स्थानकात कुणीही सहज प्रवेश करू शकतो. त्याचाच फायदा चोरटे घेत आहे. रेल्वे स्थानकाबरोबर रेल्वेतही चार चोर्‍या करत आहेत. यावर्षी पाच महिन्यात १५५ चोर्‍या झाल्याची नोंद रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी केली आहे. त्यात सर्वाधिक मोबाइल चोरी झाल्याची नोंद असल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिस हेड  कॉ. माणिक आचार्य यांनी दै.सांजवार्ताशी बोलताना दिली. एक तर रेल्वेमध्ये प्रवास करणार्‍यांची संख्या सर्वाधिक असते. त्यातच काही जण रेल्वेत प्रवास करत असताना बॅग कुठेही ठेवून झोपी जातात. त्याचाच फायदा चोर घेतात. याशिवाय काही जण फोनवर बोलण्यात व्यस्त असतात तर काही जण कानात हेडफोन लावून गणे ऐकण्यात मग्न असतात. त्याचाच फायदा चोरटे घेत आहेत. 

रेल्वे स्थानक परिसर ते रेल्वेमध्ये जानेवारी ते आतापर्यंत तब्बल १५५ विविध प्रकारच्या चोर्‍या झाल्याची नोंद रेल्वे लोकमार्ग पोलिसांनी केली आहे. त्यात १६ जणांचे पॉकिट चोरट्याने पळविले आहे. तर दोन जणांची सोन्याची चैन चोरट्याने पळविली आहे. याशिवाय प्रवाशांच्या नकळतपणे चोरट्यांनी बॅग पळविल्याचे प्रकार समोर आले आहेत. एकूण १७ जणांच्या बॅग चोरट्यांनी चोरल्या आहेत. तसेचि इतर प्रकारच्या वस्तू चोरांनी पळविल्या आहेत. 
१११ मोबाइल चोरीला 155 चोर्‍यांपैकी सर्वाधिक चोर्‍या मोबाइलच्या झाल्या आहेत. तब्बल 111 मोबाइल रेल्वेतून चोरट्यांनी पळविले आहेत. अनेक प्रवासी मोबाईल चार्जिंगला लावतात आणि झोपी जातात. त्याचाच फायदा चोर घेत असून मोबाइल पळवित आहे. याकडे प्रवाशांनी लक्ष देण्याची गरज आहे. प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळेच काही चोर मोबाइल चोरत आहेत. 

केवळ तीस प्रकार उघडकीस !
१५५ चोर्‍यांपैकी केवळ ३० चोरीचे प्रकार उघडकीस आले आहे. अजूनही १२५ चोरी प्रकरणांचा शोध रेल्वे पोलिस घेत आहेत. ३५चोर अटकेत यावर्षी १५५ चोर्‍या आतापर्यंत रेल्वेमध्ये झाल्या आहेत. त्यापैकी चोरी करणारे ३५ चोरांचा शोध रेल्वे पोलिसांना लागला असून त्यांना रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी अटकही केली आहे. इतर चोरांचा शोध रेल्वे पोलिस घेत आहेत. 

प्रवाशांनी चोरापासून सावध राहावे .....
प्रतिदिन हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. त्यात तपोवन एक्सप्रेस, नंदिग्राम एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेससह अनेक गाड्यांमध्ये सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असते. गर्दी लक्षात घेऊन चोर चोर्‍या करतात. त्यामुळे प्रवाशांनी बॅग, मौल्यवान वस्तू, मोबाइल सांभाळून ठेवावे, असे आवाहन रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.